सांजवार्ता ऑनलाईन Mar 07, 2020
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणूक महाविकास आघाडी सोबत लढण्याचा निर्णय झाला असून पक्ष नेत्यांनी आपसातील वाद बाजूला सारून पक्षाच्या उमेदवारालाच निवडून देण्यासाठी प्रयत्न करावे असा वडिलकीचा सल्ला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. ते राष्ट्रवादी भवन येथे महापालिका निवडणुकी संदर्भात पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. कमी जागा मिल तरी नाराज न होता ज्या वार्डात ताकद आहे त्याच वार्डात उमेदवार उभा करा, वार्ड वार्ड अभ्यास करून नियोजन करा. असं ही ते म्हणाले. शहराच्या विकासाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे जा अस आदेश ही त्यांनी पदाधिकारीबव कार्यकर्त्यांना दिला. या वेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहर अध्यक्ष विजय, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, माजी शहर अध्यक्ष नगरसेवक खाजा शरफोद्दीन, मुश्ताक अहमद, पीएस जवळकर उपस्थित होते. कमाल फारुकी कादिर पाऊलं संजय वाघचोरे व जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील यांनी आपले आपले विचार मांडले.